बारा बलुतेदार व्यावसायिकांना लॉकडाउन मधून वगळावे – खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या वर्षभरापासून सद्यस्थिती नाभिक समाजासह विविध बारा बलुतेदार व्यावसायीक बांधवांचे तसेच सलून कारागिरांचे अर्थकारण कुठेतरी रुळावर आलेले असताना शासनाने पुन्हा एकदा  लॉकडाउन लावण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी सुरू केलेली असल्याने पुन्हा नाभिक समाजासह विविध बारा बलुतेदार व्यावसायीक बांधवांचे तसेच सलून कारागिरांचे सूरु असलेले व्यवसाय अडचणीत येणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊन मधून बारा बलुतेदार समाजाच्या व्यवसायिकांना यातून पाच दिवस सकाळी दहा ते सहा वाजे पर्यंत व्यवसायाची परवानगी देण्यात यावी अशी विनंती आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मुख्यमंत्री ना. उध्दवसाहेब ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

आज श्री संत सेना महाराज नाभिक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव बहाळकर यांच्या नेतृत्वात खासदार उन्मेश पाटील यांना समाजाच्या निवेदन दिले. या अनुषंगाने आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मुख्यमत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती केली आहे. 

आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील म्हणाले की कोरोना महामारीवर पुन्हा एकमेव लॉकडाउन हा उपाय नसून शनिवार-रविवारी शासनाने केलेले आदेश व्यापारी व्यावसायिक पाळण्यास तयार असताना पूर्ण आठवडा लॉकडाउन करणे व्यापारी व्यावसायिक कामगार यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी ठरणार आहे. त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले असल्याने व्यापाऱ्यांना कर्जाचे हप्ते, आपल्या व्यावसायिक बँक अकाऊंट मध्ये करावयाचा भरणा, करांचा भरणा, कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या सुखदुःखात मदत करण्याचा प्रसंग असेल अशा प्रसंगी स्वतः आर्थिक अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांनी  लॉकडाऊन विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची भावना शुद्ध असून शनिवार रविवारी आम्ही संपूर्ण 100%  लॉकडाऊनला सहकार्य करू मात्र इतर पाच दिवस नाभिक समाजासह विविध बारा बलुतेदार व्यावसायीक बांधवांना तसेच सलून कारागिरांना आमचे व्यवसाय शासनाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्याची परवानगी कायम ठेवावी. 

आज या संदर्भात कापड व्यापारी, सोनार व्यवसायिक, गॅरेज हार्डवेअर, सिमेंट स्टील व्यापारी, रेडिमेड कापड व्यवसायिक, मोबाईल विक्री दुरुस्ती करणारे, नाभिक समाजासह विविध बारा बलुतेदार व्यावसायीक बांधव तसेच सलून कारागिर लहान-मोठे व्यावसायिक अशा विविध व्यापाऱ्यांनी आपला रोष माझ्याकडे व्यक्त केला असून मी या पत्राद्वारे आपणास विनंती करतो की, आपण कृपया शनिवार-रविवारी असलेला लॉकडाऊन कायम ठेवत इतर पाच दिवस व्यापाऱ्यांना कायद्यात शिथिलता द्यावी अन्यथा आम्ही लोकप्रतिनिधींना देखील व्यापाऱ्यांसह नाभिक समाजासह विविध बारा बलुतेदार व्यावसायीक बांधव तसेच सलून कारागिर लहान-मोठे व्यावसायिकांसोबत रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल.

कोरोना धोरणाचा मुकाबला करण्यासाठी व्यापारी व्यवसायिक यांचे आतापर्यंत मनापासून सहकार्य लाभले आहे याचा विचार करीत कृपया आपण नाभिक समाजासह विविध बारा बलुतेदार व्यावसायीक बांधव तसेच सलून कारागिर लहान-मोठे व्यावसायिक व व्यापाऱ्यांना शनिवार रविवार सोडून पाच दिवस व्यवसायाची परवानगी द्यावी. अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे. 

यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांचेशी समाज अध्यक्ष शिवाजीराव बहाळकर यांनी दूरध्वनीवर आपल्या भावणा मांडल्यात. अध्यक्ष शिवाजी बहाळकर, उपाध्यक्ष शिवानंद महिंदळेकर, सचिव  किरण नेरपगार, सह सचिव निलेश महाले, ज्येष्ठ नेते लोटन सोनवणे, खजिनदार गणेश सोनवणे,नाना आहीरे, आशिष आहिरे,दिपक शिंदे,शाम अहिरे, भिकन बागुल,पिंटू वाघ,  विकी जाधव, भूषण वारुळे,गणेश वाघ,सुनिल वेळीस,सुभाष वेळीस,सचिन गांगुडे,उलकेश वाघ,मुन्ना सैंदाने,विष्णु चित्ते,योगेश आहिरे,भारत नेरपगार,वाल्मिक चित्ते,शाम सोनवणे,दत्तू चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content