जैताने येथील वाचनालयाला शिक्षक पी. डी. पाटील यांची सदिच्छा भेट!

धरणगाव प्रतिनिधी| येथील आदर्श शिक्षक असलेले पी.डी.पाटील यांनी धुळे जिल्हातील जैताने या गावातील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला सदिच्छा भेट देत विद्यार्थांना वाचनाचे महत्व पटवून दिले.

धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांनी नुकतीच  धुळे जिल्हातील जैताने या गावातील  महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला सदिच्छा  भेट दिली. दरम्यान त्यांनी सदर वाचनालयात हजारो पुस्तके पाहायला मिळाल्याने त्यांनी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष अनिल सोनवणे यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थांशी पी. डी. पाटील यांनी संवाद साधतांना पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होते व  सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. असे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. यामुळे ग्रंथ हेच गुरु असतात अशी भावना आदर्श शिक्षक पी. डी. पाटील व्यक्त केली.या भेटीदरम्यान अनिल महाजन यांनी मनोहर लिखित “मी सावित्री माझी कर्मकहाणी”, कॉ. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? “. हे अनमोल ग्रंथ मान्यवरांना यावेळी भेट देण्यात आली. याप्रसंगी मांदुर्णे गावातील प्रगतीशील शेतकरी धर्मराज पुंडलिक पाटील, खान्देश माळी महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश ओंकार महाजन, वंजारी बुद्रुक गावचे सरपंच गणेश महाजन, महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील , आदर्श कन्या विद्यालयाचे उपशिक्षक तसेच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मधुकर सोनवणे व संचालक सुनिल मधुकर सोनवणे आदी उपस्थित होते.

 

Protected Content