राज्यातील निर्बंध अजून होणार शिथील !

मुंबई प्रतिनिधी | दिवाळी आधी राज्यातील निर्बंध अजून शिथील होण्याची शक्यता असून आज टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर हा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यात अजून काही नवीन निर्णयांची भर पडण्याची शक्यता दिसून येत आहे. पुढच्या काही दिवसात राज्यातल्या मॉल, दुकानं, हॉटेल्स याबाबत काही अटी नियम शिथिल होतील असे सरकारकडून संकेत मिळाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज टास्कफोर्ससोबत बैठक होतेय. यात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री १० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही ५० टक्के ग्राहकांनाच मुभा आहे. या पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. लोकलबाबतही मोठा निर्णय अपेक्षीत आहे. सध्या ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेत, त्यांना प्रवासाची मुभा आहे. पण दिवाळीनंतर कदाचित यातही बदल होऊ शकतो, ज्यांचा एक डोस झालेला आहे त्यांनाही काही नियम अटींवर प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

Protected Content