हतनूरच्या आवर्तनामुळे भुसावळकरांना दिलासा

भुसावळ प्रतिनिधी । हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे भुसावळकरांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हतनूर धरणातून शनिवारी दुपारी १ वाजता ११.२५ दलघमीचे आवर्तन सोडण्यात आले. तापी पात्रातील पालिकेच्या बंधार्‍यात जानेवारी अखेरीस आवर्तन पोहचणार आहे. यामुळे शहराला १ फेब्रुवारीपासून पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल. पालिकेच्या सध्याच्या बंधार्‍यात केवळ २२ ते २५ दिवसांचा साठा केला जातो. प्रशासनाने आता हा साठा किमान ३५ दिवस पुरेल अशी तरतूद करुन बंधार्‍याची उंची पावणेदोन फुटांनी वाढवली आहे. यामुळे आगामी उन्हाळ्याच्या काळात तापीबंधार्‍यातील पाणी अधिक काळ टिकण्याची शक्यता आहे.

Add Comment

Protected Content