आधी पैसे भरा…मगच जामीन मागा : सुप्रीम कोर्टाचे अनिल चौधरींना निर्देश

भुसावळ प्रतिनिधी । महिलेची फसवणूक करून गाळे खरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आधी महिलेचे ६० लाख ७० हजार रूपये अदा करावेत, नंतरच जामीनसाठी अर्ज करावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यावर आता अनिल चौधरी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ येथील महिलेकडून रुपये ६० लाख ७० हजार रुपये घेऊन गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनिल चौधरी यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. https://livetrends.news या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने आधी देखील वस्तुनिष्ठ वृत्त दिलेले आहेत. (लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह)

या प्रकरणी अनिल चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत फेटाळला होता. त्यानंतर अनिल चौधरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी https://livetrends.news सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी दिनांक २१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवले की सदर प्रकरणात असलेली वस्तुस्थिती व उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण पाहता तुम्ही आधी १९ऑक्टोबर २०१९ रोजी घेतलेली संपूर्ण रक्कम ६० लाख ७० हजार रुपये संबंधित दिवाणी न्यायालयात दिनांक २४ मे पर्यंत जमा करा त्यानंतरच तुमच्या जामीन अर्जावर विचार करु अन्यथा सदरचा अर्ज रद्द करण्यात येईल. त्यामुळे आता अनिल चौधरींनी घेतलेली https://livetrends.news व्यवहारातील मूळ रक्कम ते संबंधित दिवाणी न्यायालयात भरतात किंवा कसे यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे जर त्यांनी पैसे भरल्यास संबंधित जामीन अर्जावर दिनांक २५ मे रोजी सुनावणी होईल असे न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद केले आहे. यामुळे आज ते पैसे भरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह)

Protected Content