धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्सहात संपन्न झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अॅड वसंतराव शिवदास भोलाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्वप्रथम सभेत संस्थेच्या सभासदांमधून सभेच्या कामकाजासाठी दिपक शंकर सोनार यांना सभेचे अध्यक्षस्थान हे देण्यांत आले. संस्थेचे अध्यक्ष अॅड वसंतराव शिवदास भोलाणे यांनी संस्थेचा या वर्षातील आढावा सादर केला. संस्थेन जो नफा मिळविलेला आहे. त्यातून ७ % लाभांश हा सभासदांना देण्यांत यावा असे अॅड. भोलाणे यांनी जाहिर केले. पुढे संस्थेतील कामकाज हे अहवालातील विषयानुसार झाले त्यांनंतर संस्थेचे व्हा. चेअरमन श्री सुधाकरसेट वाणी त्यांनी सभासदांचे आभार मानले.
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने संस्थेने रू. १० हजार कर्जासाठी रू.१२% स्वामी विवेकानंद व्यापार वृध्दी कर्ज योजना सुरू केली त्याचा आढावा मांडला. सभेत संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच संस्थेचे संचालक कडु रूपा महाजन, डॉ. प्रशांत भावे, प्रकाश जाधव, उषा वाघ, सुरेखा चौधरी, प्रतिभा चौधरी, सरला चौधरी, मिलींद पवार, सत्यवान कंखरे, विनायक बागुल, दिलीप पाटील संस्थेचे मॅनेजर व सर्व कर्मचारी वर्ग हे उपस्थीत होते.