२४ सप्टेंबर “सत्यशोधक समाज स्थापना दिवस” विविध कार्यक्रम घेऊन साजरा करावा

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | २४ सप्टेंबर सत्यशोधक समाज स्थापना दिवस म्हणून शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन साजरा करावा अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांनी काढून आदेशीत करावे अशी मागणी ओबीसी शिक्षक असोसिएशनने केली आहे.

 

महात्मा ज्योतिराव फुले निर्मित सत्यशोधक समाज स्थापना दि, २४ सप्टेंबर २०२२ रोजी १५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.  म्हणजेच सत्यशोधक समाजाचे शतकोत्तर सुवर्ण वर्षात पदार्पण होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात येते. त्यांनी छत्रपती शिवरायांना आदर्श मानून शूद्र अतिशूद्र व स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले.

सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानून छत्रपती शाहूजी महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील,  राष्ट्रसंत गाडगे महाराज या सर्व महापुरुषांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जागृती केली. त्यामुळे आधुनिक लोकशाहीभिमुख भारत देशाची निर्मिती झाली परिणामी आपल्या सर्वांना शिक्षण व इतर हक्क अधिकार मिळालेत.

२४ सप्टेंबर या दिवशी आपण सर्वांनी शैक्षणिक संस्थेत, शाळेत, कार्यालयात, सामाजिक संघटनेमार्फत या दिवशी समाज जागृतीचे कार्यक्रम सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षानिमित्त आयोजित करण्यात यावेत अशी विनंती सत्यशोधक समाज संघाच्या सत्यशोधकांकडून करण्यात येत आहे. अशी मागणी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्य अध्यक्ष विलासराव पाटील, जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, जिल्हा महिला अध्यक्षा वसुंधराताई लांडगे,सल्लागार दशरथ लांडगे, जिल्हा कार्याध्यक्ष बी.आर.महाजन धरणगाव,  डि.ए.सोनवणे, मनोहर पाटील, पी.एस.विंचूरकर, एन.आर.चौधरी, सोपान भवरे,सौ भारती चव्हाण,पक्षीमित्र अश्विन पाटील, किरण पाटील, आशिष शिंदे, दिपक पवार, अनिल महाजन सह ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी मागणी जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मेलद्वारे मागणी केली आहे.

Protected Content