भुसावळ तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू : आ.संजय सावकारे(व्हिडिओ)

वरणगाव, दत्तात्रय गुरव |  भुसावळ तालुक्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक आ. संजय सावकार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत तहसीलदार, मंडल अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते.

 

आढावा बैठकीनंतर आ. संजय सावकारे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,  सध्या अंतिम अहवाल येणे बाकी आहे.  दोन दिवसानंतर नुकसानीचा फायनल रिपोर्ट  होईल. जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यात   शेती आणि शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने भुसावळ तालुक्यात नुकसानीचे प्रमाण कमी आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे याची नोंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन दिवसांमध्ये तालुक्याचा आढावा सादर होईल त्यामध्ये समजेल की तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेकडून पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना कुठलाही त्रास दिला गेला नाही व दिला जात नाही, नॅशनल बँकाकडून टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे हे सत्य आहे. या शेतकऱ्यांचा शेतीचा नुकसानीचा पंचनामा झालेला नाही हे मी स्वतः जाऊन कृषी विभागाला माहिती देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी दिले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3010062649312902

Protected Content