फैजपूर येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हे दाखल

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरात एका भागात किरकोळ कारणावरून दोन गटात अश्लिल शिवीगाळ करून एकाला विषारी औषध पाजण्याच्या प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या गटाने दिलेल्या फिर्यादीवरून, यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील एका भागात राहणारे ३० वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. त्याच भागात राहणारा शेख शकील शेख दगू हा जुन्या वादातून तरुणीला अश्लील शिवीगाळ करून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या प्रकरणी पीडित महिलाच्या फिर्यादीवरून शेख शकील शेख दगू यांच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लवंड करीत आहे.

तर दुसऱ्या फिर्यादीत शेख शकील शेख दगून याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित महिला ही अनोळखी तीन जण व एक मुलगा (पुर्ण नाव माहित नाही) हे ४ ऑक्टोबर रोजी फैजपूर पोलीस ठाण्याच्या आवारात येवून शेख शकील याला शिवीगाळ केली तर इतर तिन जणांनी शेख शकील याचा विषारी औषण तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला तर तोंडावर औषण फवारणी केली. भडव्या पोलीसांच्या मदतीने माझी बदनामी करतो असे म्हणत खिश्यातील २० हजार रूपयाची रोकड काढून घेतला. हा प्रकार सायंकाळी ६ वाजता घडला. याप्रकरणी शेख शकी शेख दगू यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!