पत्रकार संजय सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार

faizpur purskar

फैजपूर, प्रतिनिधी | ज्ञानज्योती शिक्षण मंडळ वाकोला मुंबई संचलित, आनंद रात्र विद्यालय सांताक्रुज पूर्व या संस्थेचे ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सव समारोप समारंभानिमित्त संदेश महाविद्यालय टागोर नगर विक्रोळी (पूर्व) येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात दै. तरुण भारतचे पत्रकार संजय रवींद्र सराफ यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी कारगिल युद्धातील शौर्य पुरुष (दोन्ही पाय व उजवा हात गमावलेले) मेजर दीपचंद नायर व माउंट अबू येथील रेडिओ मधुवन मॅनेजर यशवंत पाटील तसेच राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्राचे अध्यक्ष मेजर व्ही.आर. जाधव यांचे शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी संदेश महाविद्यालय संस्थाध्यक्ष शिक्षण महर्षी तथा शिक्षणतज्ञ बाळासाहेब म्हात्रे, भाषाप्रभू डॉ. राम नेमाडे, संस्थाध्यक्ष जनार्दन जंगले, सचिव बाळकृष्ण खडसे, मातोश्री फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, डॉ. भुषण जंगले, सौ. मधुबाला जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
सराफ यांचे पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Protected Content