पाचोऱ्यात कृषी दिनानिमित्त विशेष मोहिम

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील राज्य शासनाचा कृषी विभाग व पंचायत समिती पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवनी मोहिम-२२ हरीत क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आली.

या मोहिमेचा समारोप दि. १ जुलै २०२२ रोजी पाचोरा येथील रामदेव लॉन्समधे “कृषी दिन” साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, कृषी शास्त्रज्ञ सुमेरशिंग राजपूत, बी. डी. जडे, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, अभय पाटील, अनिल धना पाटील, कृषी अधिकारी एस. एन. पाटील, कृषी विस्तार अधिकारी आर. एस. गढरी, एस. पी. मोरे, मंडळ अधिकारी संजय मोहिते, अशोक जाधव, के. एफ. पाटील, एस. ए. पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शास्रज्ञ सुमेरसिंग राजपूत, बी. डी. जडे, रमेश जाधव, तहसिलदार कैलास चावडे, मधुकर काटे, गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी कै. वसंराव नाईक यांचे जीवनावर प्रकाश टाकत कृषी विकासासाठी त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. तर सुमेरसींग राजपूत यांनी आजचा शेतकरी हा कडधान्य पिकांकडे दुर्लक्ष करीत असून ज्या जमिनीत हेक्टरी ३५ क्विंटल कडधान्ये होत होते ते आता केवळ ८ ते ९ क्विंटलवर येवून ठेपले आहे. आपला शेतकरी हा वार्षिक तीन पिके घेण्याच्या नादात लागल्याने दिवसेंदिवस जमिनीची पोत घसरु लागली आहे. शेतकऱ्यांनी जमिन तपण्यासाठी केवळ दोन पिके घेऊन जमिन नांगरुन ठेवल्यास ती अधिक सुपीक होऊन अधिक उत्पन्न देते. या सोबतच शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया न करता पिकांची पेरणी करु नये, कापसाचे पिक घेत असतांना त्या सोबत अंतर पिक म्हणून उडीद व मुगाचे पिक घ्यावे. यासाठी जमिनीतून पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. उडीद व मुग पिकांमूळे नायट्रोजन वाढून जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.

यावेळी सरपंच प्रतिभा पाटील, मदन तडवी, कृषी सहायक उमेश पाटील, व्ही. एस. पाटील, आर. पी. पाटील, विद्या पानपाटील, रविंद्र पाटील, व्ही. यु. पाटील, के. एन. जाधव सह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.

Protected Content