मॅजिक पेनचा गैरवापर : शासनाची लाखो रुपयांत फसवणूक (व्हिडीओ)

e70f50fd 19cd 43cb 9a6d 53e457930d4e

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील माहिजी येथे गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी ठेकेदाराला जिल्हाधिकारी कार्यालयातुन आज (दि.१०-६-२०१९) दुपारी २.०० नंतर वाळू उपसा करण्याची ऑर्डर प्रत मिळाली होती. मात्र ठेकेदारांनी सकाळी ७ वाजेपासून अवैध रीतीने मॅजिक पेनचा वापर करून वाळू उपसा सुरु केला आहे. ऑर्डर प्रत येण्याच्या आधीच ठेकेदाराने सुमारे १५ ते २० लाख रुपयांची वाळू उपसा करून शासनाची फसवणुक केली आहे.

 

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाकडे चौकशी केल्यास मॅजिक पेनचा वापर करून पावतीवर खाडाखोड करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच वाळूच्या महसूल पावतीवर लिहिलेले होते सहा ब्रास, प्रत्यक्षात मात्र वाहतूक होत होती १० ब्रास पेक्षा अधिक. तसेच तालुक्यातील गिरणा पात्रातील वाळू नाशिक मनमाडकडे वाहतूक केली जात आहे, या प्रकारणी प्रांताधिकारी यांनी तात्काळ चौकशी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Add Comment

Protected Content