सामाजिक गरजांना प्राधान्य देणे आवश्यक : सुनिता घाटे

snita ghate

 

चाळीसगाव प्रतिनिधी । आई फाऊंडेशन व शारदा नेत्रालय आयोजित, नेत्र तपासणी शिबीर आई हॉस्पिटलमध्ये संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन सुनिता घाटे यांचे हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंतरावजी चंद्रात्रे, डॉ. विनोद कोतकर व डॉ. चेतना कोतकर हे कार्यक्रमास उपस्थित होते.

जसे की, अलिकडे सार्वजनिक जीवनात अनेक सामाजिक समस्या आपण अनुभवतो. पण त्याकडे, डोळसपणे बघून त्या समस्यांवर मात करण्यासाठी सामाजिक संघटनांनी काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी सुनिता घाटे यांनी केले. आई फाऊंडेशनचे विविध क्षेत्रातील सामाजिक काम सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी बाबासाहेब चंद्रात्रे यांनी नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया ही समाजातील गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे सांगत आई फाऊंडेशनमुळे एक नविन दृष्टी रुग्णांना मिळणार असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले.

आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद कोतकर यांनी चाळीसगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या आयोजनामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळाला असून आतापर्यत ५५० शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे सांगितले. शिबिराची कुठेही जाहिरात वा बॅनरबाजी न करता ‘सेवा हाच धर्म’ हे आई फाऊंडेशनचे ब्रीद असल्याचे देखील डॉ. विनोद कोतकर यांनी याप्रसंगी म्हटले. शिबिरात १७८ रुग्णांची तपासणी होवून मोतिबिंदू शस्त्रक्रियेची गरज असलेल्या ३४ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शारदा नेत्रालय येथे होणार असल्याची माहिती आई फाऊंडेशनच्या सचिव डॉ. चेतना कोतकर यांनी शिबीराच्या समारोप प्रसंगी दिली.

Add Comment

Protected Content