जळगावात तीन जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; १५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुजराल पेट्रोल पंपजवळ, पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट परिसर आणि ब्रेन हॉस्पीटलच्या मागे या परिसरात काही कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळणाऱ्यांचा डाव सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने उधळला. तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत एकुण १५ जणांवर जिल्हापेठ पोलीसात २ तर रामानंद नगर पोलीसात १ असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत  १ लाख १६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने काल मंगळवार २७ जुलै रोजी सायंकाळी शहरातील ब्रेन हॉस्पिटल मागे असलेल्या एका झोपडी बनवुन काही जण कल्याण मटका जुगार सुरू होता. यावर धडक कारवाई करत सचिन अनंत जाधव (वय-२५) रा. जोशी पेठ, गौतम धोंडु तायडे (वय-५९) रा. समता नगर, सुदर्शन विजयसिंग राजपूत (वय-३५) रा. हिरा शिवा कॉलनी, गोपाल काशिनाथ पाटील (वय-३६) रा. त्रिभुवन कॉलनी, रमेश रामकृष्ण बारी (वय-४९) रा. रामेश्वर कॉलनी, अनिल विठ्ठल कोठावदे (वय-६२) रा. गणेश कॉलनी आणि संदीप पांडुरग चव्हाण (वय-२६) रा. वाघ नगर यांच्यावर कारवाई करत त्यांच्याजवळून ९ हजार ३०० रूपये रोख इतर साहित्य असे एकुण ७८ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याच पथकाने गुजराल पेट्रोल पंपाजवळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रात्री ८.२० वाजता दुसरा छापा टाकला. या कारवाईत संशयित आरोपी शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२), भारत शामलाल कुकरेजा (वय-२६) दोन्ही  रा. सिंधी कॉलनी आणि अशोक शशिकांत चौधरी (वय-३६) रा. रामेश्वर कॉलनी यांच्या ताब्यातून ११ हजार ८२० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य असा एकुण २४ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.  या दोन्ही कारवाईनंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

तिसरी कारवाई पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केट परिसरात

रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केटमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोहेकॉ संजय सपकाळे, पो.ना. प्रविण जगदाळे यांनी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपी हानीफ गुलाम रसुल पिंजारी (वय-५०) रा. प्रताप नगर ढाके कॉलनी, सोनु बनवारीलाल सैनी (वय-१८) रा. पिंप्राळा, हरीषचंद्र बाबुराव रूले (वय-६७) रा. हरीविठ्ठल नगर, मुकुंद प्रल्हाद वानखेडे (वय-४४) रा. दुधफेडरेशन पिंप्राळा हुडको आणि शितल अभिमन शिरसाळे (वय-४१) रा. पिंप्राळा यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून १२ हजार ९४० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत सट्टा खेळविणारा विठ्ठल पाटील रा. खोटे नगर हा फरार झाला आहे.  याप्रकरणी पाच जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content