राज्य सरकार कृषी विरोधी : वासुदेव काळे यांचे टीकास्त्र (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | केंद्रातील मोदी सरकार शेतकरी हिताच्या योजना यशस्वीपणे अंमलात आणत असतांना राज्य सरकारने मात्र सातत्याने कृषी विरोधी भूमिका घेतल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले. किसान संवाद यात्रेनिमित्त जळगावात आले असतांना ते पत्रकारांशी बोलत होते.

भारतीय जनता किसान मोर्चातर्फे आज किसान संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर वासुदेव काळे यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या सात वर्षात शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. या सर्वांबाबतची माहिती व्हावी म्हणून किसान संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदीजींनी आपले सरकार हे कृषी केंद्रीत असल्याचे दाखवून दिले आहे. या कार्यक्रमात मोदी सरकारने राबविलेल्या १९ योजनांबाबत माहितीचा समावेश असणार्‍या पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी वासुदेव काळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकर्‍यांच्या विरोधी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मात्र सरकारने पंचनामे देखील केले नसून मदतीसाठी सरकार फक्त हे केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

खालील व्हिडीओत पहा वासुदेव काळे नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/508992935887325/videos/535203671013932

Protected Content