जिल्ह्यातील भीषण पाणी व चारा टंचाईवर उपाययोजना करण्याची रा.कॉ. ची मागणी (व्हिडीओ)

2b245657 3ce0 43b9 a73e 43de0cc7170f

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण झाली असून राज्य शासनाने त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्या, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

या निवेद्नात म्हटले आहे की, राज्यासह जिल्ह्यात भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेती व पशुधन वाचवणे कठीण झाले आहे. चारा टंचाईवर उपाय म्हणून छावणी मंजुरी साठी ४८ अटी कमी कराव्या, छावणीसाठी ५०० गुरांच्या संख्येची अट शिथिल करावी, प्रत्येकाने केवळ पाच गुरे आणावी ही अटही मागे घ्यावी, गुरांना प्रत्येकी दिल्या जाणाऱ्या अन्नाची मात्रा वाढवावी, प्रत्येक गुरासाठी दिले जाणारे अनुदान वाढवावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष (महानगर) नामदेवराव चौधरी, प्रदेशाध्यक्ष (अल्पसंख्यक) गफ्फार मलिक आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

Add Comment

Protected Content