यावल येथील राष्ट्रवादीच्या शहर कार्यध्यक्षपदी मोहसीन खान यांची निवड

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोहसीन खान अब्दुल वहाब खान यांची राष्ट्रवादी पक्षाच्या यावल शहर कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचा प्रसार प्रचार करून सर्वसामान्यपर्यंत पक्षाचा विचार पहोचण्याचे प्रयत्न करावे, याकरीता जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. रविन्द्रभैय्या पाटील यांनी पक्षाच्या जळगाव येथील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोहसीन खान यांची पत्र देवुन निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे यावल तालुका प्रा. मुकेश येवले, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक देशपांडे , पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी गिरधर पाटील, राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी, यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , माजी नगराध्यक्ष राकेश कोलते ,अब्दुल सईद शेख , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अ .करीम चौधरी, वसंत गजमल पाटील, अय्युब खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दिनकर पाटील, गनी भाई , ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , आदींनी खान यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content