शहरातील दोन बीएसएनएल टॉवर सील; महापालिका वसुली पथकाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दोन बीएसएनएल भोवटादारांना नोटीस बजावूनही थकबाकी न भरणाऱ्या ‍सिध्देश्वर नगर आणि दांडेकर नगरातील दोन बीएसएनएल टॉवर आज महापालिकेच्या वसुली पथकाने सील केले आहे. अशी माहिती प्रभाग अधिकारी उदय पाटील यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या प्रभास समिती क्रमांक ४ च्या अंतर्गत असलेलया वसुली पथकाने आज सर्वप्रथम सिध्देश्वर नगरातील प्लॉटनंबर ७ वरील भोगवटादार संजय भागवत पाटील यांच्या इमारतीवरूरील मोबाईल टॉवरवर ५ लाख ५८ हजार ८६९ रक्कम येणे बाकी होते. तर याच पथकाने शहरातील दांडेकर नगर परिसरातील  भोगवटादार गणेश कदम यांच्या जय मातादी अपार्टमेंटवरील बीएसएनएल टॉवरवर ६७ हजार ८१५ रक्कत वसुलचे बाकी होते. वारंवार नोटीस बजावूनही कर न भरल्याने आज महापालिकेच्या प्रभाक क्रमांक चारच्या वसुली पथकाने धडक कारवाई करत दोन्ही टॉवर सील केले आहे.

यांनी केली कारवाई

वसुली पथकात प्रभाग अधिकारी उदय पाटील, कर अधीक्षक इंद्रजीत सिंह पाटील, मनिराम भोये, कुमार कुलकर्णी, जितेंद्र सोनवणे, महेंद्र पाटील, संजय सपकाळे, अनंत जावळे यांनी कारवाई केली.

Protected Content