एरंडोल नपा तत्कालिन कार्यालय अधिक्षक मिसर यांना माहिती आयोगाचा दणका : २५०० रुपयांचा ठोठावला दंड

 

एरंडोल,प्रतिनिधी । येथील नगरपालिका सध्या दीड लाखाच्या लाचप्रकरणी जिल्ह्यासह राज्यात चर्चेत आली आहे. कार्यालय अधिक्षक ढमाळ सध्या न्यायालयीन कोठडीत असून एरंडोल नपाचे तत्कालिन कार्यालय अधिक्षक मिसर यांनी चुकीची, अयोग्य, दिशाभूल करणारी माहिती पुरविल्याबद्दल राज्य माहिती आयोगाने मिसर यांना २, ५०० रू. (दोन हजार पाचशे) दंड ठोठावला असून मुख्याधिकारींना दंड वसुलीचे आदेश दि. १९ मार्च २०२१ रोजी दिले असल्याने शहर, परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

 

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, एरंडोल येथील पत्रकार आबा संतोष महाजन (रा. माळीवाडा, एरंडोल) यांनी एरंडोल नपाकडे दि. ७ सप्टेंबर २०१७  रोजी माहिती अर्ज दिला. परंतू, तत्कालिन कार्यालय अधिक्षक तथा जनमाहिती अधिकारी एस. जी. मिसर यांनी चुकीची मोघम माहिती पुरविली. आबा महाजन यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अपिल दाखल केले. त्यानुसार राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी दि. ९  फेब्रुवारी २०२१  रोजी खुलासा सादर करण्याचे नपास आदेश दिले. परंतू खुलासा आला नाही. याचा अर्थ काहीही म्हणणे नाही असे गुगल मीटद्वारे ऑनलाईन सुनावणीसाठी मिसर उपस्थित राहून लेखी खुलासा दिला नाही. आयोगाने आदेश दिला की, तत्कालिन कार्यालय अधिक्षक एरंडोल नपा एस. जी. मिसर यांना आयोगाच्या नियमानुसार २,५०० /- (दोन हजार पाचशे मात्र) दंड करण्यात आला असून मुख्याधिकारींना वसुलीचे आदेश दिले आहेत. सदर बाबत जिल्हाधिकारी जळगाव यांना देखील कळविण्यात आले आहे. यापूर्वी देखील एरंडोल नपा तत्कालिन माहिती अधिकारीस दोनदा दंड झालेला आहे. माहिती अधिकारानुसार नागरीकास माहिती मिळावी अशी अपेक्षा असतांना एरंडोल नपा मात्र दशाभूल करते यास म्हणावे तरी काय ?

Protected Content