भडगाव नगरपरिषदेत ५ लाख ७० हजाराचा अपहार; चौकशीची मनसेची मागणी

भडगाव प्रतिनिधी । भडगाव नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी, प्रशासकसह कर्मचारी यांनी संगनमताने शासनाने बंदी केलेले किटकनाशक नाशिक येथील दिपक लॅब यांच्याकडून ५ लाख ७० हजार रूपयांचा अपहार केल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे.

 

कोराना सुरूवातील पंतप्रधान यांनी लॉकडाऊन जाहीर केले होते. कोरोना काळात भडगाव नगरपरीषदने २४ जानेवारी २०२० च्या ठरावानुसार आरोग्य विभागसाठी जंतुनाशके औषध- पावडर घेणेसाठी निविदा मागवुन त्यातील दिपक लॕब नांदगाव यांना टेंडर देण्यात आले. दिपक लॅब यांना मिळालेल्या आदेशनुसार त्यांनी १) लॉरवास मास्किटो आईल किंवा तत्सम १ हजार लिटर, २) डीडीव्हीपी ७६ टक्के ईसी ५०० लिटर ३) इडोपावडर डस्ट ५ टक्के २ हजार किलो, ४) सेंटेड फिनाईल १ हजार लिटर या साहित्याचे संबंधित दिपक लॅबला १ मे २०२० ला नगरपरीषदेने ११ लाख २२ हजार रुपये त्यात शासकीय कपात करुन ९ लाख ८७ हजार ३६० रुपये अदा केले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १) लॉरवास मास्किटो आईल किंवा तत्सम ५०० लिटर, २) डीडीव्हीपी ७६ टक्के ईसी ५०० लिटर ३) इडोपावडर डस्ट ५ टक्के २ हजार किलो खरेदी करत १६ मार्च २०२१ रोजी त्याचे बिल ९ लाख ४८ हजार ५०० रुपये शासकीय कपात करुन ८ लाख ३४ हजार ६८० रुपये दिपक लॅब यांना अदा केले आहे. हे खरेदी करताना डीडीव्हीपी ७६ टक्के ईसीचा दर १३९० प्रती लिटर निश्चित करण्यात आला आहे. मात्र डीडीव्हीपी ७६ टक्के ईसीचा दर निविदापुर्वी ८२० प्रती लिटर असा होता. असे असताना जास्तीची किंमत दाखवुन संगनमताने दिपक लॅब  नांदगाव यांना टेंडर देण्यात आले. तसेच केंद्र शासनाने ८ ऑगस्ट २०१८ च्या परीपत्रकनुसार १८ कीटकनाशकावर बंदी घातली आहे. त्यात डीडीव्हीपी ७६ टक्के ईसीचा समावेश असुन याची माहिती असताना त्याचा वापर करुन नगरपरीषद हद्दीत राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याशी खेळत जीव धोक्यात घातला आहे. तसेच डीडीव्हीपी ७६ टक्के ईसी ची बंदी पुर्वीची किंमत ८२० प्रती लिटर रुपये असताना मात्र १३२० रुपये प्रती लिटर खरेदी करुन प्रतीलिटर ५७०/- रुपये जादा दराने खरेदी दाखवुन ५ लाख ७० हजार रुपयाचा संगनमाने अपहार केला आहे. असा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी पत्रकार परीषदेत करत दोषी विरुध्द योग्य ती चौकशी करुन तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबतची तक्रार अनिल वाघ यांनी जिल्हाधिकारी डाॕ. अभिजित राऊत यांच्या कडे देखिल केली आहे.

Protected Content