Home क्राईम कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लांबविला

कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लांबविला

0
104


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गांधी मार्केट मधील कपड्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ४५ हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, स्वप्निल संजय भोई (वय-२०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांचे महात्मा गांधी मार्केट येथे फंकी बॉईज नावाचे कपड्याचे दुकान आहे. कपड्याचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ मार्च रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी ६ वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान आज १ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान फोडल्याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी तातडीने गांधी मार्केट येथे येऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी शटरची खालची पट्टी तोडून आत प्रवेश करत जीन्स पॅन्ट, शर्ट, टी-शर्ट आदी वस्तू चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. यामध्ये एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत स्वप्निल भोई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस कर्मचारी करीत आहे.

 


Protected Content

Play sound