सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे ; ३ दिवसात दोन्ही सरकारांना बाजू मांडण्याचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहार सरकारची मागणी मान्य करत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआय करणार असल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. यावेळी कोर्टाने महाराष्ट्र, बिहार सरकारला आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना ३ दिवसात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले.

 

केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली असून ही केस सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. तर रियाचे वकील श्याम दिवान यांनी सांगितले की, मेहता यांनी जे काही सांगितले तो या सुनावणीचा विषय नाही. न्यायालयाने याचिकेवर लक्ष घालावे. रियाने या सर्व चौकशी प्रकरणावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. बिहारमध्ये नोंदवलेला एफआयआर हा कायद्यानुसार नाही. यामुळे न्यायालयाने हे रोखावे, अशी मागणी दिवान यांनी केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार सरकारचा सीबीआय चौकशीचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारले आहे. केंद्र सरकार लवकरच सीबीआय चौकशीचे आदेश देऊ शकते अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ते तुषार मेहता यांनी दिली. दरम्यान, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांना चौकशीपासून रोखणे चांगले संकेत नसल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकारला सुनावले.

Protected Content