सुवर्णपदक विजेता निषाद सोनोने याचा सत्कार

जळगाव, – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भारत शासन क्रीडा मंत्रालय आणि नेहरू युवा केंद्र औरंगाबाद प्रायोजित अखिल भारतीय शालेय कराटे चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेत निषाद महेंद्र सोनोने याने कुमिते व काता प्रकारात अनुक्रमे सुवर्ण व कास्य पदक पटकावल्याने त्याचा सत्कार करण्या आला.

अखिल भारतीय शालेय कराटे चॅम्पियनशिपस्पर्धा १२ डिसेंबर २०२१ रोजी मराठा मंदिर, औरंगाबाद येथे कुमिते आणि काता या प्रकारात घेण्यात आली होती. यात भारतातून एकूण ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला होता. यातून निषाद सोनोने याने कुमिते (Fight) प्रकारात सुवर्ण पदक आणि काता प्रकारात कांस्य पदक मिळवले होते. त्याच्या यशानिमित्ताने युडीज हेअर अँड ब्युटी मेकअप पार्लरचे संचालक उदय भास्कर पवार, त्यांच्या मातोश्री नलिनीताई भास्कर पवार आणि भाजपा कामगार आघाडी जळगावचे अध्यक्ष कुमार सिरामे यांच्यातर्फे निषाद सोनोने याचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निषादचे आई-वडील आणि कुटुंबीय उपस्थित होते.

Protected Content