सुलाईबुलाई भक्त पोर्णिमा उत्सव रद्द

पारोळा, प्रतिनिधी : येथील श्री सुलाईबुलाई माता भक्त परीवार सतत आठ वर्षांपासून शहरातील भक्तांनकडे दरमहा पोर्णिमा उत्सव साजरा करत असुन सद्या संपुर्ण जगात कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव पसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यात कलम १४४ नुसार सार्वजनीक कार्यक्रमास बंदी असल्याने आजचा पोर्णिमा उत्सव हा रद्द करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, श्री सुलाई बुलाई माता भक्त गण कुलदेवतेचे नामस्मरण करून आई भगवतीची गित गाणी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात परंतु आज संपूर्ण जगात कोरोना विषांणुचा अंहकार असुन हा संसर्ग रोखण्यासाठी संर्पक टाळा यासाठी कोणी ही एकत्रीत न येता सर्वानी आप आपल्या घरी देवीचे नामस्मरण जप करून आईभगवतीला विनंती करूया की लवकर या आजारापासुन जगाला मुक्त कर त्यामुळे देशांचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे व राज्यचे आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्वानी वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, संर्पक टाळा, एकत्र येऊ नका कोणीही घराबाहेर फिरू नये शासन व प्रशासन ज्या सुचना देतात त्या आपल्या व परिवारांच्याच हितांच्या दृष्टीने चांगल्या साठी आहे सहकार्य करावे असे आवाहन परिवाराचे मार्गदर्शक विठ्ठल नावरकर, दत्तात्रय येवले, सुरेश नावरकर, विजय नावरकर, दिनेश नावरकर, योगेश मैद, प्रसाद नावरकर सर, सुहास येवले, प्रशांत येवले, बापु नावरकर यांनी केले आहे.

Protected Content