सुप्रिम कॉलनी परीसरात लोखंडी हत्यार फिरणाऱ्यास अटक

jalgaoncrime

जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परीसरात हातात लोखंडी हत्यार घेवून फिरणाऱ्यास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात आर्म ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी संशयित आरोपीच्या विरोधात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलीनी परीसरात मच्छी बाजाराजवळ प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपी रउफ खाटीक (वय-२२) रा. जुम्माशहा वखारजवळ तांबापूरा हा हातात लोखंडी हत्यार घेवून परीसरात दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळाल्यानंतर त्यांना सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोकॉ सचिन पाटील, पोकॉ इम्रान सैय्यद, पोकॉ मुदस्सर काझी यांनी घटनास्थळी गुरूवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अटक केली असून त्यांच्या ताब्यातील २८ सेंमी लांबीचा लोखंडी हत्यार हस्तगत केला आहे. दरम्यान याच संशयित आरोपी अरबाज यांच्या विरोधात एमआयडीसी हद्दीत एकला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल होता तेव्हापासून तो फरार होता. एमआयडीसी पोलीसात मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अरबाज याच्या विरोधात आर्म ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content