कोर्ट चौकात कारची दुचाकीला धडक; एक जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, गणपतीनगरातील किराणा व्यावसायिक प्रकाश भिला वाणी (वय ६४) हे १७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा अमित वाणी याच्यासोबत त्यांच्या (एम.एच.१९ बी.एफ.१५९९) क्रमांकाच्या दुचाकीवरून  गावात आले होते. काम आटोपल्यावर घरी चित्रा चौकातून शिवाजी महाराज पुतळ्याकडे जात असताना भोरटके झेरॉक्स सेंटर समोर त्यांच्या दुचाकीला (एम.एच.१९.ए.पी.२४४८) या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रकाश वाणी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. उपचारानंतर  प्रकाश वाणी यांनी मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक प्रकाश कापसे रा पिंप्राळा यांच्याविरोधात शहर  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय बडगुजर हे करीत आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!