मासिक पाळी आली आहे का? तपासण्यासाठी ६८ विद्यार्थिनींना काढायला लावली अंतर्वस्त्रे

gujrat girls

अहमदाबाद (वृत्तसंस्था) मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी एका कॉलेजने ६८ विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार भूजमध्ये घडला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

 

भुजमधील स्वामीनारायण मंदिराच्या अनुयायी हे महाविद्यालय आणि हॉस्टेल चालवितात. श्री स्वामीनारायण कन्या मंदिराच्या आवारात हे हॉस्टेल उभे आहे. संस्थेच्या निकषानुसार, मासिक पाळीत स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापासून किंवा मंदिराजवळ जाण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. मासिक पाळी आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्श करण्याची परवानगी नाही. हॉस्टेलच्या एका प्राध्यापिकेकडे काही अधिकाऱ्यांनी तक्रार केली की, मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनी स्वयंपाक घरात गेले असून मंदिराजवळ फिरल्या. त्यानंतर हॉस्टेल प्रशासनाने या विद्यार्थिनींना वर्गातून बाहेर पडण्यास जबरदस्ती केली आणि पॅसेजमध्ये रांगेत उभे केले आणि कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासले. या पकरणी पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल केली आहे. यावर कच्छ विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Protected Content