तलवार घेऊन दहशत माजवणारा अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील टेक्निकल हायस्कुल मागील भागात एक तरूण हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याचे गुप्त माहिती निरीक्षकांना मिळताच सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी पो कॉ जितेंद्र संतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संदीप प्रकाश मोरे (वय ३०, राहणार रमाई नगर) सफाई कामगार म्हणून काम करत आहे. काल रात्री आठच्या सुमारास टेक्निकल हायस्कुल परिसरात तो हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत फिरत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली. या अनुषंगाने घटनास्थळी शहर पोलिस स्टेशन कर्मचारी बंटी सैदाने ,साहिल तडवी, संजय बडगुजर,जुबेर शेख,जितेंद्र सोनवणे यांनी पाठवून सापळा रचून आरोपीला तलवारसह ताब्यात घेतले.

या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ , ३७/१(३) चे उल्लंघन केल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सुपडू पाटील करीत आहेत.

Protected Content