सीएए पाठींबा पण राज्यात एनआरसी लागू होणार नाही : मुख्यमंत्री

Uddhav ayodhya

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिकाही घेतली आहे. परंतू सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) मात्र, त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपण संपादक असलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, सीएएमुळे देशातील कोणत्याही नागरिकाची नागरिकता हिसकावून घेतली जाणार नाही. मात्र, एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ दिले जाणार नाही. जर एनआरसी लागू झाले तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांना नागरिकता सिद्ध करणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे मी असे होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा दिला. आम्ही हिंदुत्व सोडले नाही आणि कधी सोडणारही नाही. महाराष्ट्रात आम्ही आघाडी केली आहे. याचा अर्थ आम्ही धर्म बदलला आहे असा होत नाही. विचारधारेशी कोणतीही तडजोड केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content