यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक उद्या दि.2 ऑगस्ट रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून या बैठकीला पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचीउद्या दि.2 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यावल येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहा मध्ये पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असुन यामध्ये नुकत्याच होवु घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदे च्या निवडणुकी संदर्भात विषयी चर्चा करण्यासाठी व गट व गणांची नविन झालेल्या पुनर्रचने च्या व आरक्षण, संभाव्य उमेदवार संदर्भात चर्चा केली जाणार आहेत. तसेच यावल व फैजपूर शहरांच्या नगरपरिषद प्रभाग रचना आरक्षण व उमेदवारा विषयी महत्वाच्या विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी जिल्हातील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार असुन यावल तालुक्यांतील व यावल, फैजपूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधी पक्षाचे सर्व आघाडींचे अध्यक्ष ,सदस्य व पदाधिकारी यांनी आवश्य उपस्थितीत रहावे असे आवहान यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.