शेतीसाठी माहेरुन पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण विवाहितेला तिने शेती घेण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत या कारणावरुन तिचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात रविवार, ३१ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील उज्ज्वला ऊर्फ दिपाली किशोर कोळी यांचा विवाह जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील किशोर कोळी यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर काही दिवसानंतर उज्ज्वला हिने माहेरुन शेती घेण्यासाठी पाच लाख रुपये पैसे आणावेत या कारणावरुन तिचा पतीसह सासरच्या चार जणांनी छळ करण्यास सुरुवात केली. सासरी तसेच माहेरी अशा दोन्ही ठिकाणी उज्ज्वला हिचा सासरच्यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने उज्ज्वला ह्या माहेरी मेहरुन येथे निघून आल्या. याप्रकरणी उज्ज्वला कोळी यांच्या तक्रारीवरुन तिचे पती किशोर दिनकर कोळी, सासू वछला दिनकर कोळी, सासरे, दिनकर रामचंद्र कोळी, नणंद मंगला राजू वाघ सर्व रा.तळेगाव ता.जामनेर या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहेत.

Protected Content