Home राजकीय कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती ; संजय राऊत यांचे...

कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती ; संजय राऊत यांचे ट्विट

0
101

sanjay raut

मुंबई (प्रतिनिधी) लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती… हम होंगे कामयाब… जरूर होंगे …असे सूचक ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. प्रकृती बरी नसतानाही राऊत यांनी रुग्णालयातून ट्विट करत शिवसेनेने हार मानली नसल्याचे संकेत दिले आहेत.

 

गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती बरी नसतानाही संजय राऊत यांनी रुग्णालयातून ट्विट करत शिवसेनेने हार मानली नसल्याचे संकेत दिले आहेत. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करून आम्ही यशस्वी होणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सोमवारी अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound