सीएए कायदा : दिल्लीत दोन गटात दगडफेक ; तणावाचे वातावरण !

caa delhi1

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील जाफराबाद परिसरातील मौजपूरमध्ये सीएए कायद्याचे विरोधक आणि समर्थकांच्या दोन दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी अश्रु धुरांचा वापर करावा लागला.

 

सीएएच्या निषेधार्थ जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या होत्या. तर कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात मौजपूर चौकाजवळ हनुमान चालीसेचे पठण सुरु होते, यादरम्यान सीएए विरोधांसोबत त्यांची बाचाबाची झाली आणि त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाली आहे. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंनी होणारी दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. महिलांच्या आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशनने जाफराबाद स्टेशनवर मेट्रो ट्रेन्सना थांबण्यास मनाई केली आहे. तसेच, स्टेशनमध्ये येण्या-जाण्याचे गेटही बंद करण्यात आले आहेत.

Protected Content