कोविड चाचणी केंदारवरच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा (व्हिडिओ)

 

शेगांव, प्रतिनिधी । राज्य सरकारच्या आदेशानंतर नगर पालिकेकडून शहरातील व्यापाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केल्याने मागील दोन दिवसात कोविड चाचणी केंदारवर व्यापाऱ्यांची  गर्दी  आहे. या केंद्रावर कोरोना नियंत्रण सूचनांची पायमल्ली होत असून सोशल डिस्टन्सिंगचाफज्जा उडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

मागील दोन दिवसात १६ जणांचे अहवाल पझेटिव्ह आढळून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात  कोविड चाचण्या वाढल्याने पॉझेटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये ही  वाढ झाली आहे. आता शासनाच्या आदेशामुळे शेगाव नगरपालिकेने शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी कोविड चाचणीसाठी सक्ती केल्यानंतर व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेण्यासाठी केंद्रावर  गर्दी केली. आज बुधवारी तर केंद्रावर गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले. राज्य सरकारणे  चाचणी ची सक्ती केल्यानंतर शेगाव शहरातील टाऊन हॉल येथे आरोग्य विभागा मार्फत चाचणी केंद्र उभारले मात्र येणाऱ्या व्यापार्‍यांसाठी योग्य  नियोजन न केल्याने एका हॉलमध्ये दोनशे ते तीनशे लोक गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित असल्याचे दिसून आले गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.यावेळी आमच्या प्रतिनिधीने  काही व्यापारांसोबत  चर्चा केली असता  त्यांचा रोष दिसुन  आला.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/844324546495976

Protected Content