मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावरील सुरक्षेचा आढावा मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने घेतला. त्यानुसार परिसर अभ्यास करून अनेक शिफारशी सुचविण्यात आल्या असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
एसटी कर्मचारी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी थेट घुसण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनानंतर घडलेल्या घटनाक्रमांच्या अनुषंगाने सर्व परिस्थिती, कोणत्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीमुळे आंदोलक थेट घरापर्यंत पोहोचले, याची तपासणी करण्यात आली.
पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ परिसर व निवासस्थानाच्या नकाशाचा अभ्यास मुंबई पोलिसांकडून सुरक्षा आढाव्याची पाहणी करण्यात आली. या नंतर ‘सिल्व्हर ओक’ ते गावदेवी पोलीस ठाणे यात थेट संपर्क यंत्रणा उभारणी, गावदेवी पोलीस कर्मचारी संख्येत वाढ, सिल्व्हर ओक प्रवेशद्वारावर इंटरलॉकिंग बॅरिकेटस वापर करणे आदी शिफारशी करण्यात आल्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलक कर्मचाऱ्याकडून अनुचित प्रकार होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व सुचना गोपनीय विभाग तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला सिल्व्हर ओकमधून दूरध्वनी करण्यात आली होती. शिवाय आंदोलक निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न करत असताना पण दूरध्वनी केल्यानंतरही स्थानिक गावदेवी पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे सिल्व्हर ओक व स्थानिक गावदेवी पोलीस ठाण्यात थेट संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासह गावदेवीसारख्या बंदोबस्ताच्या दृष्टीने संवेदनशील पोलीस ठाण्यातील पोलिसाच्या रिक्त जागा भरण्याची देखील विशेष शाखेकडून शिफारस करण्यात आली आहे.