सिलेंडर दर, बुकिंग, बँकांच्या वेळा, व्याजदर, रेल्वे वेळापत्रक बदलणार

मुंबई वृत्तसंस्था । सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत गॅस सिलेंडरसह इतर नियमांमध्ये बदल होत आहे. सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. तसेच राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे.

आजपासून राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. आता बँका सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत सुरू राहतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकाना हा नियम लागू असेल. याबाबत काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयाने सूचना दिल्या होत्या. तसेच सिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागणार आहे. ओटीपी नसल्यास ग्राहकांना सिलेंडर नाकारलं जाणार आहे. इंडेनने आता बुकिंगसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेन ग्राहकांना आता 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करुन सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे. तसेच रेल्वे देखील देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात आजपासून बदल करणार आहे.

इंडेनने आता बुकिंगसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेन ग्राहकांना आता 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करुन सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे. तसेच रेल्वे देखील देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात आजपासून बदल करणार आहे. तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. ०.२५ टक्क्यांच्या कपातीनंतर आता व्याजदर ३.२५ टक्के असणार आहे.

Protected Content