रावेर तालुक्यात ॲड. रोहिणी खडसे यांचा दौरा; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी केली चर्चा

रावेर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे यांनी आज रावेर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या कार्यकर्ताच्या भेटी घेतल्या.

राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशा नंतर जिल्हा बँक अध्यक्षा अँड रोहिणीताई खडसे प्रथमच सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त तसेच कार्यकत्यांच्या भेटीसाठी रावेर तालुक्यात आले होते. त्यांनी ऐनपूर, शिंगाडी, वाघाडी, खिर्डी खु, खिर्डी बु, बलवाडी, सावदा, कोचुर खु येथे विविध ठिकाणी भेट देऊन पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी समवेत पं.स. सदस्य दिपक पाटील, संस्था अध्यक्ष संदीप भंगाळे, विलास पाटील, घनश्याम भंगाळे, रामकृष्ण कोल्हे, भास्कर भंगाळे, भरत लढे, डॉ सुनिल कोल्हे, निळकंठ बढे, किरण नेमाडे, पवन चौधरी, गफूर कोळी, सतिष फेगडे, राजु महाजन यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content