Home Cities भुसावळ नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

0
34


भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथील नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यात पाचवीत असणारे विद्यार्थी चाचणी परीक्षा देऊ शकणार आहेत.

साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०२१-२२मध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी होणार्‍या निवड चाचणीसाठी आवेदन पत्र व माहिती पत्रके उपलब्ध झाले आहेत. २२ ऑक्टोबरपासून ते १५ डिसेंबरपर्यंत www.navodaya.gov.in या साईटवर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या निवड चाचणी परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतील. ही परीक्षा १० एप्रिल २०२१ रोजी जिल्ह्यातील नियोजित परीक्षा केंद्रांवर होईल, असे प्राचार्य डॉ.आर.आर.खंडारे यांनी कळवले आहे. तर विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या माहितीसाठी जी.आर.सरनाईक, शैलेंद्रकुमार नागवंशी, पी.एस.कोवे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound