सिमेंट घेऊन जाणारा ट्रक धरणगावनजीक कोसळला

 

धरणगाव, प्रतिनिधी | जळगावहून चोपडा येथे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात असतांना रस्त्याच्याकडेला जाऊन उलटल्याने ट्रकचे नुकसान झाले आहे.

जळगाव येथून सिमेंट घेऊन जाणार ट्रक क्रमांक एमएच – १५ ,इजी ७६७० हा कारला वाचविण्याच्या प्रयत्नात असतांना तो ट्रक रस्त्याच्याकडेला जाऊन उलटला. या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नाही. ही घटना पहाटेच्या सुमारास धरणगाव महाविद्यालयानजीक घडली आहे. दरम्यान, आज सायंकाळी ५ च्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने ट्रकला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कुठलाच गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Protected Content