Home Cities जळगाव जळगावात मालवाहू रिक्षाची वृध्दास धडक; चालकाविरोधात गुन्हा

जळगावात मालवाहू रिक्षाची वृध्दास धडक; चालकाविरोधात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । भारधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू रिक्षाने वयोवृध्दास जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. ही घटना कोंबडी बाजार परीसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीसात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरात वास्तव्यास असलेले पांडूरंग चौधरी (वय-६०) यांची कोंबडी बाजार परिसरात चहाची टपरी आहे. आज सकाळी चहाच्या टपरीवर आल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास टपरीच्या बाजूला ते पाण्यात हात धूत होते. त्यावेळी चित्रा चौकाकडून पुष्पलता बेंडाळे चौकाकडे जात असलेली भरधाव मालवाहतूक रिक्षाने त्यांना समोरून जोरदार धडक दिली़ यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली व त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. अखेर याप्रकरणी शनिवारी त्यांनी शहर पोलिसात येवून माल वाहतूक रिक्षा चालक डिगू चौधरी याच्याविरूध्द फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound