सासवड येथे श्री संत सोपान काका मंदिरात मुक्ताई मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठा

मुक्ताईनगर – पंकज कपले |  श्रीक्षेत्र सासवड जि.पुणे येथे संत सोपान काका महाराज यांची समाधी आहे. तेथे संत मुक्ताबाई समाधीस्थळ मुक्ताईनगर येथून संस्थानच्या वतीने आज सासवडला मुर्ती पाठविण्यात आली.

 

संत मुक्ताई बंधू सोपान काका यांनी आईसाहेबांचा लहानपणी सांभाळ केलेला आहे. याचीच आठवण  म्हणून संत सोपान काका संस्थान सासवड यांनी संत मुक्ताई नूतन मंदिर बांधले. त्यामध्ये संत मुक्ताबाई समाधीस्थळ मुक्ताईनगर येथून संस्थानच्या वतीने आज सासवडला मुर्ती पाठविण्यात आली. संत मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष भैयासाहेब रवींद्र पाटील, रविंद्र महाराज हरणे, सम्राट पाटील, लखन महाराज, सासवडला मूर्ती घेऊन रवाना झाले.  दि. 30 नोव्हेबर ते 2 डींसेबर पर्यंत  मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात  येईल या सोहळ्यास  मुक्ताई फडावरील वारकरी भाविक उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी आज पहाटे सुदेश दिगंबर महाजन तुरकगोराळा यांनी संपत्ती महापूजा अभिषेक केला व भाविकांना फराळ वाटप केले आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा असल्याने आळंदीला जावू शकले नाही म्हणून आज कार्तिक वारी एकादशी मुक्ताई मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली.

 

Protected Content