सावदा येथील नवरात्रोत्सवानिमित्त फळ वाटप

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथे स्व. सुमन बाबुराव चौधरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त फळ वाटप करण्यात आले.

 

सावदा येथील ८ वर्षापासून कार्यरत असलेली स्व . सुमन बाबुराव चौधरी बहुद्देशीय संस्थेमार्फत सुश्रुत हॉस्पिटल, सुश्रुत एक्सिडेंट हॉस्पिटल तसेच स्वामी हॉस्पिटलमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वावर बाळंत झालेल्या महिलांना तसेच इतर सर्व पेशंटला फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनीता वारके, आणि डॉ. अविनाश बऱ्हाटे, अस्थी रोग तज्ञ डॉ.उमेश पिंपळे यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सारिका चौधरी, सचिव राजेश चौधरी उपस्थित होते. या फळवाटप कार्यक्रमास अमूल्य असे सहकार्य सावदा नगरपरिषदेचे कर निरीक्षक अनिल आहुजा यांचे लाभले. त्याचप्रमाणे सावदा दुर्गा केबल नेटवर्कचे किशोर परदेशी तसेच पत्रकार तथा प्रेशियस कॉम्प्युटर चे संचालक प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.

Protected Content