सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

 

उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सामनाच्या संपादकपदामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने आता सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. रश्मी ठाकरे यांच्या या नियुक्तीसह त्यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा सन्मान मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचीशपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचे संपादकपद सोडले होते. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर या पदावर ठाकरे कुटुंबातीलच व्यक्ती असणार हे आता स्पष्ट झाले आहे. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले होते.

Protected Content