जळगाव तालुका शिवसेना पदाधिकार्‍यांची कार्यकारीणी जाहीर

jalgaon Shivsena

जळगाव प्रतिनिधी । सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या सुचनेनुसार जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी जळगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व पदाधिकार्‍यांना ओळखपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.

नवीन कार्यकारिणीमध्ये उपजिल्हा संघटकपदी नरेंद्र सोनवणे, तालुका संघटकपदी संजय घुगे तर तालुका समन्वयक म्हणून मुकेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणीमध्ये उपतालुका प्रमुखपदी बिलवाडी येथील धोंडू जगताप, नशिराबादचे दगडू महाजन, प्रमोद सोनवणे (भोकर) यांची तर उपतालुका संघटकपदी राजेंद्र पाटील (मान्यरखेडा), सुनील बडगुजर (बोरणार), विलास चौधरी (आव्हाणे) यांची तर उपतालुका समन्वयक पदावर छगन खडसे (भादली बु), विजय आमले (म्हासावद) व पंकज पाटील (तरसोद), विभाग प्रमुख : देविदास कोळी (शिरसोली-चिंचोली जि.प.गट), सुरेश गोलांडे (म्हासावद-बोरणार), हिरालाल कोळी (नशिराबाद-भादली), प्रकाश पाटील (आसोदा-ममुरबाद), गजानन सोनवणे (कानळदा-भोकर) यांची तर विभाग संघटक : शेनफडू पाटील, भगवान सपकाळे-पाटील, विनायक धर्माधिकारी, अजय महाजन, शामकांत जाधव, विभाग समन्वयक जनार्दन पाटील, युवराज पाटील, संभाजी सोनवणे, पुरुषोत्तम पाटील, विजय सपकाळे यांची नियुक्ती केली आहे.

यासोबत प्रत्येक पंचायत समिती गणासाठी एक गण प्रमुख याप्रमाणे तालुक्यातील १० पंचायत समिती गणासाठी १० गण प्रमुखांची नेमणूक केली आहे. गणप्रमुख नीलेश ठाकरे, विजय पाटील, महेंद्रसिंग पाटील, सचिन पाटील, बापू चौधरी, भूषण पाटील, दिलीप जगताप, डॉ. रमाकांत कदम, नीलेश वाघ, योगेश लाठी यांची नियुक्ती केली आहे. शहरातील अजिंठा विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात या सर्व पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालक व नियोजन विश्‍वनाथ पाटील यांनी केले.

Protected Content