आपच्या हमीपत्राला भाजपचे ७० संकल्पाद्वारे उत्तर

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने जारी केलेल्या हमीपत्राला भाजपने संकल्पपत्राद्वारे उत्तर दिले आहे.

केजरीवाल यांच्या १० कलमी हमीपत्राला भाजपने संकल्पपत्र जारी करून उत्तर दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, दिल्ली प्रभारी शाम जाजू, विजय गोयल व भाजप प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत संसदीय पक्षाच्या बैठकीत त्याबद्दलची घोषणा करण्यात आली. या जाहीरनाम्यात भाजपने प्रदूषण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत, परिवहनसह सर्व आवश्यक गरजांची पूर्तता करू, असे सांगणारी ७० आश्‍वासने दिली आहेत. संकल्पपत्रात भाजपने दिल्लीत सत्तेवर आल्यास गरिबांना प्रतिकिलो दोन रुपयांनी आटा, दररोज घरी स्वच्छ पाणी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना पहिल्या दोन मुली २१ वर्षांच्या झाल्यानंतर प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. गरीब विद्यार्थिनींना मोफत इलेक्ट्रिक स्कूटी व ९ वी व १२ वीच्या वर्गापर्यंत नि:शुल्क सायकल देण्याचेही वचन भाजपने दिले आहे. आपने २०० युनिट मोफत वीज,१ हजार लिटर पाण्याच्या आश्‍वासनाला भाजपचे गडकरी यांनी भाजप सत्तेवर आल्यास शिखर प्रदेशातील पाणी दिल्लीत आणू, अशी ग्वाही यात देण्यात आली आहे.

Protected Content