जळगाव विमानतळावर नाइट लँडिंगला मंजुरी

Raksha unmesh

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या पाठपुराव्याने अखेर जळगावच्या विमानतळावर नाईट लँडींगला परवानगी मिळाली आहे.

जळगाव विमानतळाला नागरी विमान उड्डयन प्राधिकरणाकडून(डीजीसीए) नाइट लँडिंगसाठीच्या परवानगीला मंजुरी मिळाली आहे. विमानसेवा अखंडित रहावी, म्हणून यावर कायमस्वरुपी उपाय योजना म्हणून २४ फेब्रुवारी २०१९ ला नाइट लँडिंग परवानगीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार उन्मेष पाटील व खासदार रक्षा खडसे यांनी नागरी उड्डयन मंत्री, मंत्रालय, विमान प्राधिकरण, संसद आदी ठिकाणी पाठपुरावा केला. यामुळे ही परवानगी मिळाली आहे.

राज्यात असलेल्या विमानतळांपैकी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विमानतळावरच नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध आहे. जळगाव विमानतळाचा यात समावेश झाल्याने ही सुविधा असणारे जळगाव हे पाचवे विमानतळ ठरले आहे.

Protected Content