कोरोना : जळगाव जिल्ह्यातील सर्व बिअर बार आणि देशी दारू दुकानात मद्य पिण्यास बंदी !

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जळगाव जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी २० मार्च रोजी रात्री १० वाजेपासून तर ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व बिअर बार आणि देशी दारूची दुकानात मद्य  पिण्यास  बंदी घातली आहे.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये होणारा संपर्क टाळण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या या पत्रकात आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बिअर बार आणि देशी दारूच्या दुकानावर प्रचंड गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हीच गर्दी लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि मुंबई मद्य निषेध कायदा कलम १४२ (१) अन्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील देशी, विदेशी मद्य विक्री, किरकोळ मद्यविक्री, बिअर बार दिनांक २० मार्च २०२० पासून ३१ मार्च २०२० पर्यंत पूर्ण दिवस मद्य पिण्यास पूर्ण दिवस  बंदी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, वाईन शॉप, बिअर शॉपी चालकांना दुकानावर गर्दी होणार नाही. तसेच ग्राहकांना हात धुण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Protected Content