वृध्दाच्या बंद घरातून मोबाईलसह वायरलेस स्पीकरची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगरात वृध्दाचे बंद घर फोडून घरातून मोबाईल आणि वायरलेस स्पीकर चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना शनीपेठ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक असे की, संजय केशवराव मोहिते वय ६१ रा. कांचन नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. देवदर्शनासाठी ते उज्जैन येथे गेले होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी ११ ते १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान त्यांचे घर बंद होते. त्यामुळे घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडाचे नट उघडून घरात प्रवेश करत घरातून मोबाईल आणि वायरलेस स्पीकर असा मुद्देमाल चोरून नेला.

संजय माहिते हे घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी शनीपेठ पोलीसांना चोरी झाल्याबाबत माहिती कळविली. संजय मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानुसार संशयित आरोपी शुभम दिलीप सोनवणे रा. कांचन नगर आणि सोबत एक अल्पवयीन मुलगा या दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.

Protected Content