राष्ट्रवादीच्या पात्र-अपात्रतेवर आज फैसला; नार्वेकर देणार निकाल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी एकमेकांच्या समर्थक आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षाकडं अपात्रतेचे दावे दाखल केले आहेत. यावर अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर आज अखेर निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत.

आमदारांच्या अपात्रतेबाबत उशीर होत असल्यानं शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. पण अद्याप साक्षी नोंदवण्याचं काम बाकी असल्यानं नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला पंधरा दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार, कोर्टानं त्यांची विनंती मान्य केली होती. त्यामुळं १५ फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार हे निश्चित झालं होतं.

Protected Content