मध्यप्रदेशातील सरकार वाचणे अशक्य : दिग्वीजय सिंग

भोपाळ वृत्तसंस्था । विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या २२ आमदारांशी संपर्क होत नसून भाजपने धनबलाचा प्रयोग केल्याचा आरोप करत आमचे सरकार वाचणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते दिग्वीजय सिंग यांनी दिली आहे.

मध्यप्रदेशमधील कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले असून ते बहुमत चाचणीआधीच राजीनामा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंग यांनी आपली हतबलचा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, खूप प्रयत्न करूनदेखील त्या २२ आमदारांसोबत संपर्क झाला नाही. भाजपने धनबलाचा वापर करून त्यांना फितवले असल्याचा आरोप सिंग यांनी केला. दरम्यान, भाजपची ही खेळी बघता मध्यप्रदेशातील सरकार वाचणे अशक्य असल्याची प्रतिक्रयादेखील दिग्वीजय सिंग यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content